भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी 100 % अनुदान | Bhausaheb Fundkar Falbag Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhausaheb Fundkar Falbag Yojana : नमस्कार मित्रांनो जय लेखामध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर आजच्या या लेखात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेशी संबंधित सविस्तर माहिती पाहणार आहोत.

शेतकरी बांधवांना तुम्हाला माहीतच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी अनेक विविध प्रकारच्या योजना या सतत राबवल्या जात असतात. त्यामधीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ही आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकरी मित्रांना फळबाग लागवडीसाठी प्रति एकर 1 लाख 40 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे.

तर आजच्या या लेखात आपण शेतकऱ्यांना कशाप्रकारे अनुदान दिले जाते आणि किती टप्प्यांमध्ये दिले जाते तसेच या योजनेसाठी लागणारे आवश्यक पात्रता काय त्याची कागदपत्रे काय याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेची माहिती सविस्तरपणे मिळून जाईल आणि जर या योजने संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेची माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

Bhausaheb Fundkar Falbag Yojana :

Bhausaheb Fundkar Falbag Yojana
Bhausaheb Fundkar Falbag Yojana

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या या योजनेचा जीआर शासनातर्फे 18 जानेवारी 2024 ला निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

हे पण वाचा :

महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणार मोफत 3 सिलेंडर : पहा कसा मिळवायचा लाभ | Mukhyamantri Annapurna Yojana

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना या आयोजनेअंतर्गत देण्यात येणारी फळांची रोपे :

  • आंबा
  • डाळींब
  • काजू
  • पेरु
  • सिताफळ
  • आवळा
  • चिंच विकसित जाती
  • जांभूळ
  • कोकम
  • फणस
  • कागदी लिंबू
  • चिकू
  • संत्रा
  • मोसंबी
  • अंजिर

हि फळांची रोपे या योजनेअंतर्गत देण्यात येतात.

Bhausaheb Fundkar Falbag Yojana थोडक्यात माहिती :

योजनेचे नावभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना
ही योजना कोणा अतर्गत सुरू करण्यात आलीही योजना महाराष्ट्र सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली आहे
योजनेचा उद्देश या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान देणे
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
योजनेचा लाभयोजने अंतर्गत फळबाग लागवडीसाठी एकूण १०० % अनुदान मिळणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
फळझाड लागवड करण्याची मुदत31 मे ते 30 नोव्हेंबर
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान :

या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना 100% अनुदान दिले जाते. तसेच योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदानाची रक्कम कशाप्रमाणे वापरावी लागते.

  • खड्डे खोदणे
  • कलमे लागवड करणे
  • पीक संरक्षण
  • नांग्या भरणे
  • ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे

इत्यादी कामे करण्यासाठी या योजनेअंतर्गत दिली जाणारे अनुदानाची रक्कम वापरता येते.

फळपीकप्रति हेक्टरी अनुदानाची मर्यादा (रु.)
आंबा53,561
काजू55,578
पेरू202,090
डाळींब109,487
संत्रा, मोसंबी, कागदी सलबू62,578
नारळ59,622

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना फायदे :

  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.
  • त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात देखील वाढ होते.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची पात्रता :

Falbag Lagwad Yojana Eligibility

  • लाभार्थी शेतकरी हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
  • Falbag Lagwad Yojana या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
  • महाराष्ट्र बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अजिबात घेता येणार नाही.
  • अर्जदार व्यक्तीला त्याच्या शेतात फळबाग लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन असणे आवश्यक असेल.
  • जे शेतकरी फक्त शेतीवरच त्यांचे कुटुंब चालवत असतील अशा शेतकऱ्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहे आणि त्यानंतर इतर शेतकऱ्यांना.

हे पण वाचा :

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना | असा करा अर्ज | Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana

  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे त्यांच्या स्वतःची मालकीची जमीन असणे आवश्यक आणि त्या शेतीमध्ये हिस्सेदार असेल तर हिस्सेदाराचे संमतीत पत्र असणे सुद्धा आवश्यक असेल.
  • जर लाभार्थी शेतकऱ्यांनी या अगोदर इतर कोणत्याही फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतला असेल तर ते क्षेत्र सोडून इतर कोणत्याही क्षेत्रात तो फळबाग लागवड करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • 7/12 उतारा
  • उत्पन्न दाखला
  • जातीचा दाखला
  • बँक खाते पासबुक
  • दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र ( फक्त दिव्यांगांसाठी )
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर

Bhausaheb Fundkar Falbag Yojana या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत :

  • भाऊसाहेब फुंडकर Falbag Lagwad Yojana या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • अर्जदार व्यक्तीला सर्वातप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल.
  • होम पज ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर ऑनलाईन एप्लीकेशन हा पर्याय दिसेल, या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना यावर पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्या पेजवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सर्च ओपन होईल.
  • त्या अर्जात विचारलेली माहिती तुम्हाला व्यवस्थित रित्या भरायचे आहे.
  • त्यानंतर अर्थात विचारलेले आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे तुम्ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

हे पण वाचा :

या दिवशी नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे 4,000 रुपये खात्यात होणार जमा सरकारचा मोठा निर्णय | namo shetkari yojana

निष्कर्ष :

जर तुम्हाला Bhausaheb Fundkar Falbag Yojana या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

Leave a Comment