शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत मिळणार 50 % अनुदान असा मिळवा लाभ…! | Tractor Anudan Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tractor Anudan Yojana : सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की केंद्र व राज्य सरकार हे शेतकऱ्यांसाठी सतत विविध प्रकारचे योजना ह्या राबवतच असतात. आणि त्या योजनांमार्फत शेतकऱ्यांचे कसे जीवनमान सुधारेल आणि त्यांचे उत्पन्नात कशी वाढ होईल याकरिता सरकारांतर्गत शेतकऱ्यांसाठी हिताच्या योजना राबवल्या जात असतात त्याचबरोबर शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यास मदत व्हावी याकरिता केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत 8 HP ते 70 HP ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% म्हणजे जास्तीत जास्त दीड लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेची माहिती सविस्तरपणे मिळून जाईल आणि जर या योजने संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेची माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

Tractor Anudan Yojana :

Tractor Anudan Yojana
Tractor Anudan Yojana

आपल्या राज्यातील बरेचसे शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या गरीब असतात त्यामुळे त्यांना शेती कार्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री खरेदीसाठी पैसे नसतात त्यामुळेच ते वर्षांवर त्यांच्या शेतातील पिकांसाठी शेतीची मशागत ही पारंपरिक पद्धतीने करत असतात. पारंपारिक शेती पद्धतीने शेती करायची गेली तर ती खूपच विलंब व अंग मेहनतीचे काम आहे. आणि शेतकऱ्यांना त्या कामांमध्ये इजा देखील होतात. त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेती मशागत सोप्या पद्धतीने करता यावी याकरिता आणि शेतीकार्य जलद व्हावे यासाठी सुद्धा याच उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

या योजनेचे मुख्य उद्देश पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेती कामासाठी ट्रॅक्टर खरेदी करण्याकरिता या योजनेअंतर्गत 50 टक्के म्हणजेच दीड लाख रुपये यांचे उपलब्ध करून देणे आणि शेतीचे काम जलद गतीने व्हावे याकरिता ही योजना राबवली जाणार आहे.

हे पण वाचा :

या दिवशी नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे 4,000 रुपये खात्यात होणार जमा सरकारचा मोठा निर्णय | namo shetkari yojana

ट्रॅक्टर अनुदान योजना थोडक्यात माहिती :

योजनेचे नावTractor Anudan Yojana
योजनेचा उद्देशशेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करणे
योजनेचा लाभट्रॅक्टर खरेदीसाठी 1.25 लाखाचे अनुदान
योजनेचे लाभार्थीसर्व प्रवर्गातील शेतकरी
अर्ज प्रक्रियाऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने

ट्रॅक्टर योजना महाराष्ट् उद्दिष्ट :

  • राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान म्हणजेच 1.25 लाख रुपये पर्यंतच्या अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे.
  • Tractor Yojana Maharashtra योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे.
  • शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर मिळाल्याने त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ दिसेल आणि त्यांचा आर्थिक विकास सुद्धा होईल.
  • तसेच राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • आणि शेतातील काम सोपे आणि जलद गतीने करता यावी यासाठीच सरकारने ही ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केलेली आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेचे वैशिष्ट्ये : Tractor Anudan Yojana Maharashtra

  • या योजनेची सुरुवात महाराष्ट्रातील कृषी विभागांतर्गत करण्यात आलेली आहे.
  • तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रवर्गातील शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील.
  • अर्जदार शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत अर्ज करताना कुठल्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये याकरिता या योजनेची अर्ज प्रक्रिया ही अतिशय सोपी ठेवण्यात आलेली आहे.
  • या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा 60% सहभाग आणि राज्य शासनाचा 40% सहभाग असणार आहे.
  • ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ही थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करण्यात येईल.

ट्रॅक्टर अनुदान योजना योजनेअंतर्गत कसे अनुदान देण्यात येणार आहे.

2 wd ट्रॅक्टरसाठी अनुदान :

  • 8 ते 20HP ट्रॅक्टर साठी अनुसूचित जाती आणि जमातीसाठी एक लाख रुपये तर सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 75 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे.
  • 20 पेक्षा जास्त आणि 40 पेक्षा कमी एचपी साठी अनुसूचित जातीतील नागरिकांना एक लाख 25 हजार तर सर्वसाधारण नागरिकांना 1 लाख रुपये एवढे अनुदान दिले जाईल.
  •  40 एचपी पेक्षा जास्त आणि 70 hp पेक्षा कमी यामध्ये अनुसूचित जातीतील नागरिकांना 1 लाख 25 हजार रुपये व सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 1 लाख रुपये अनुदान देण्यात येईल.

4 wd ट्रॅक्टरसाठी अनुदान :

  •  8 ते 20 HP अनुसूचित जातीतील नागरिकांसाठी 1 लाख रुपये तर सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 75 हजार रुपये अनुदान देण्यात येईल.
  •  20 HP पेक्षा जास्त आणि 40 HP पेक्षा कमी अनुसूचित जातीतील नागरिकांसाठी 1 लाख 25 हजार रुपये आणि इतर सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 1 लाख रुपये.
  • 40 HP पेक्षा जास्त ट्रॅक्टरला अनुसूचित जाती जमातीसाठी 1 लाख 25 हजार रुपये आणि इतर सर्व साधारण शेतकऱ्यांसाठी 1 लाख रुपये अनुदान देण्यात येईल.

ट्रॅक्टर अनुदान योजना या अंतर्गत होणारा फायदा :

  • शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी योजनेअंतर्गत अनुदान देऊन त्यांचे जीवनमान सोयीस्कर करणे.
  • शेतकरी त्याच्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या ट्रॅक्टरच्या माध्यमातून जलद गतीने मशागत करू शकतो आणि त्याचे उत्पन्न वाढवू शकतो.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ट्रॅक्टर अनुदाना मार्फत अनेक शेतकरी शेती करण्यास प्रोत्साहित होतील.

Tractor Anudan Yojana नियम व अटी :

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ मिळेल.
  • तसेच महाराष्ट्र राज्य बाहेरी नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ नाही मिळणार.
  • फक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक असेल आणि त्याच्याजवळ त्याची स्वतःची शेत जमीन असणं सुद्धा आवश्यक असेल.
  • लाभार्थी शेतकऱ्यांना याआधी कोणतेही सरकारी योजनेअंतर्गत ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळवलेला नसावा नाहीतर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • जर लाभार्थी व्यक्ती अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील असेल तर त्या लाभार्थी शेतकऱ्याकडे त्याचा जातीचा दाखला असणे आवश्यक असेल.

हे पण वाचा :

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी 100 % अनुदान | Bhausaheb Fundkar Falbag Yojana

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठीची लागणारे आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • 7/12 व 8 अ प्रमाणपत्र
  • पासपोर्ट फोटो
  • मोबाईल नंबर
  • जातीचे प्रमाणपत्र
  • प्रतिज्ञापत्र
  • ईमेल आयडी

ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेची अर्ज प्रक्रिया :-

आपल्या ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर योजनेचा अर्ज भरायचा आहे त्यांना ऑनलाईन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज भरता येईल व या योजनेचा लाभ घेता येईल.

ऑनलाईन : अर्ज प्रक्रिया

  • लाभार्थी व्यक्तीला खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईटच्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्यानंतर त्याच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल तेथे त्याला आपल्या नवीन वर्षाची नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती विचारली जाईल ती माहिती व्यवस्थित रित्या भरायचे आहे आणि रजिस्टर करायची आहे या प्रक्रिये द्वारे तुमची रजिस्टर प्रक्रिया पूर्ण होईल तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड मिळून जाईल.
  • आता तू मला मिळालेले तुमच्या युजरनेम पासवर्ड टाकून लॉगिनवर काही करायचे आहे.
  • आता तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन कृषी विभाग या विभागात जायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान योजना या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरायचे आहे आणि आवश्यक लागणारे कागदपत्रे सुद्धा अपलोड करायची आहे.

अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून योजनेच्या लाभ मिळू शकता.

ऑफलाईन : अर्ज प्रक्रिया

  • या योजनेचा ऑफलाइन पद्धतीने लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला कृषी विभागातून ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला त्या अर्थाची प्रत वर्ती दिलेली सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  • आणि व्यवस्थित अर्ज भरल्यानंतर अर्ज आणि कागदपत्रे तुम्हाला कृषी विभागात जमा करायचे आहेत.
  • त्यानंतर तुम्हाला तेथील संबंधित अधिकाऱ्याकडून एक पोच पावती घ्यायची आहे ज्याचा वापर आपल्याला भविष्यात होईल.

अशाप्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने या योजनेचा अर्ज करू शकता.

हे पण वाचा :

पीएम इंटर्नशिप योजना या योजने अंतर्गत बेरोजगार तरुणांना दर महिन्याला मिळणार 5,000 हजार रुपये भत्ता | pm internship yojana

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

निष्कर्ष :

जर तुम्हाला Tractor Anudan Yojana या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

Leave a Comment