महिलांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : लगेच करा अर्ज | Udyogini Yojana Scheme 2024 In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Udyogini Yojana Scheme 2024 In Marathi : तर सर्वप्रथम नमस्कार केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना अतिशय महत्वाची आहे.

केंद्र सरकारकडून महिलांना उद्योगांमध्ये चालना देण्यासाठी उद्योगिनी योजना सुरू केलेली आहे. आणि महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी या योजनेअंतर्गत बिनव्याज कर्ज देखील दिले जाणार आहे. आणि या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार? योजनेची पात्रता काय असणार? योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणते याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Udyogini Yojana Scheme 2024 In Marathi

Udyogini Yojana Scheme 2024 In Marathi
Udyogini Yojana Scheme 2024 In Marathi

आपल्या भारतीय परंपरेत महिलांची योगदान अन्यसाधारण आहे कारण कुटुंबाची जबाबदारी सांभाळून अनेक महिला आत्ता आत्ता उद्योग व्यवसाय करण्यासाठी पुढे येत आहेत. परंतु अनेकदा भांडवलाच्या कमतरतेमुळे त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करता येत नाही त्यामुळेच या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने महिला उद्योगिनी योजना सुरू केलेली आहे. ज्यामुळे महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासठी आर्थिक सहाय्य दिले जाईल.

हे पण वाचा :

तार कुंपण योजनेअंतर्गत सरकारकडून मिळणार 90% अनुदान, जाणून घ्या सविस्तर माहिती | Tar Kumpan Yojana

सध्याच्या गेल्या काही वर्षात भारतात महिला उद्योगधंद्याच्या बाबतीत अतिशय पुढे आलेले आहेत आणि अनेक क्षेत्रांमध्ये महिला आपला ठसा वेगवेगळ्या उमटवताना दिसत आहे. व तसेच चालू परंपरागत व्यवसायापासून ते नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टप्स महिला अशा सर्वत्र आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत आहेत.

महिला उद्योगिनी योजना थोडक्यात माहिती :

योजनेचे नावUdyogini Yojana
योजनचे सुरवात1  जानेवारी 2020 मध्ये
योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख21 जानेवारी 2024 पर्यंत
ही योजना कोणत्या मंत्रालय तर्फे चालू करण्यात आलीभारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालय द्वारे 
या योजनेत किती % कर्ज दिले जातेबिन व्याजी कर्ज  
योजनेची लाभार्थीभारतातील उद्योगिनी महिला  
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक 

महिला उद्योगिनी योजना महाराष्ट्र :

  • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि योजनेअंतर्गत उद्योगासाठी आर्थिक मदत करणे.
  • ही योजना सर्वप्रथम कर्नाटक सरकारने सुरू केलेली होती त्यानंतर हे संपूर्ण देशभरात लागू करण्यात आले आणि केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून ही योजना संपूर्ण देश भरत राबवली जाते.
  • या योजनेमध्ये मुख्यता ग्रामीण भागातील महिलां जास्त प्राधान्य दिले जाईल कारण आत्तापर्यंत 48,000 महिलांनी या योजनेचा लाभ मिळवून त्यांचा स्वतःचा एखादा लघुउद्योग चालू करून त्या यशस्वी झालेल्या आहत.
  • या योजनेअंतर्गत महिलांना 88 प्रकारचे विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

उद्योगिनी योजनेसाठी कर्ज मर्यादा किती आहे?

  • या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिलांना तीन लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र महिलेचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाख रुपयांपेक्षा कमी असेल पाहिजे.
  • दिव्यांग महिला विधवा आणि परित्यक्तांसाठी उत्पन्नाचे मर्यादाची नाही कारण त्यांना व्याजमक्त कर्ज दिले जाते.
  • आणि इतर प्रवर्गातील महिलांना या योजनेअंतर्गत दहा ते बारा टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते कारण ज्या बँकेची कर्ज घेतले जाते त्या बँकेच्या नियमांनुसार व्याजदर हे ठरवले जाते.
  • तसेच कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार सुद्धा 30% अनुदान दिले जाते.

उद्योगिनी योजना आवश्यक पात्रता : PM Udyogini Yojana

  • लाभार्थी महिलेचे वय हे 18 ते 55 वर्षे पर्यंत असले पाहिजे.
  • व तसेच लाभार्थी व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाख रुपयांपेक्षा कमी असेल पाहिजे.
  • दिव्यांग महिला, विधवा, परितेत्य यांच्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही.

हे पण वाचा :

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मुलीच्या विवाहासाठी 51 हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार | Bandhkam Kamgar Vivah Yojana

Udyogini Yojana Maharashtra आवश्यक कागदपत्रे :

  • ऑनलाईन भरलेला अर्ज
  • आधार कार्ड
  • जन्माचा दाखला
  • शाळेचा दाखला
  • बँक खाते पास बुक
  • दारिद्र्यरेषेखालील महिला
  • रेशनकार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साइजचे दोन फोटो
  • जात पडताळणी प्रमाणपत्र

या योजनेअंतर्गत खालील क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी अतिशय लाभदायक ठरेल :

  • हस्तकला व्यवसाय : 
  1. बांगड्या बनवणे
  2. कापडावर भरतकाम
  • सौंदर्य उद्योग :
  1. ब्युटी पार्लर
  2. स्पा
  • वस्त्रोद्योग : 
  1. बेडशीट
  2. टॉवेल तयार करणे
  3. कापड व्यवसाय
  • शैक्षणिक साहित्य :
  1. नोटबुक तयार करणे
  2. बुक बाईंडिंग
  • खाद्य उद्योग :
  1. कॉफी आणि चहा बनवणे
  2. पापड निर्मिती
  • कृषी आधारित उद्योग :
  1. रोपवाटिका
  2. दुग्ध व्यवसाय
  3. पोल्ट्री फार्म
  • सेवा क्षेत्र :
  1.  डायग्नोस्टिक लॅब
  2. ड्रायक्लीनिंग
  • व्यवसाय : 
  1. सुक्या मासळीचा व्यवसाय
  • किरकोळ व्यापार :
  1.  खाद्यतेलाचे दुकान.
  • पुनर्चक्रीकरण उद्योग : 
  1. जुने कागद पुनर्वापर

या व्यतिरिक्त आणि छोट्या मोठ्या व्यवसायिकांसाठी सुद्धा या योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांनाही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महिला त्यांच्या नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करू शकतात किंवा अनेक बँकांच्या विविध वेबसाईट वरती जाऊन योजनेची माहिती पाहू शकतात व लाभ मिळू शकतात.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 3 गॅस सिलिंडर मोफत जाणून घ्या सर्व माहिती…! | mukhyamantri annapurna yojana

महिला उद्योगिनी योजना ही योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले सरकार अंतर्गत एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे आणि या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी येत आहेत उदाहरणार्थ ग्रामीण भागातील महिलांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवणे, अर्ज प्रक्रिया सोयीस्कर करणे, योजनेचे गैरवापर टाळणे आवश्यक आहे.

Udyogini Yojana Scheme Official Website

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

निष्कर्ष :

जर तुम्हाला Udyogini Yojana Scheme या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

Leave a Comment