Sauchalay Yojana Registration : तर सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण शौचालय योजना महाराष्ट्र या योजनेमध्ये माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्हाला माहीतच असेल की भारत सरकारने स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांसाठी शौचालय अनुदान योजना सुरू केलेली आहे या योजनेचा मुख्य उद्देश पाहायला गेलं तर देशातील प्रत्येक घरात शौचालय बांधून देणे आणि आपल्या भारत देशाला स्वच्छ आणि निरोगी राष्ट्र बनवणे हे आहे.
तर आजच्या या लेखांमध्ये आपण स्वच्छ भारत मिशन योजनेचे उद्दिष्टे काय असणार आहे, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणकोणत्या नियम वाटते लागणार, तसेच कोणत्या कुटुंबांना योजनेचा लाभ मिळणार, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार व सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Sauchalay Yojana Registration :
स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांच्या घरी शौचालय बांधले जाते आणि शौचालय बांधण्याकरिता सरकार अंतर्गत म्हणजेच या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तींना आर्थिक मदत पुरवली जाते जी की त्यांच्या बँक खात्यात वितरित होते आणि जर तुम्हाला घरी अद्याप शौचालय बांधकाम झाले नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ मिळू शकतात.
शौचालय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वप्रथम संबंधित नोंदणी तुम्ही पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी तुमच्याकडे पात्रता आणि सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे असेल आणि ज्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखाद्वारे मिळून जाईल त्यासाठीच हा लेख शेवटपर्यंत वाचा.
हे पण वाचा : महिलांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : लगेच करा अर्ज | Udyogini Yojana Scheme
तसेच या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील नागरिकांना स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते. यामध्ये केंद्र सरकारचा 75% वाटा (9000/- रुपये) व राज्य शासनाचा 25% (3000/- रुपये) असतो. अशाप्रकारे या योजनेअंतर्गत रक्कम वाटप केली जाते.
शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र : थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | Sauchalay Yojana Registration |
---|---|
योजनेचा विभाग | ग्राम विकास विभाग |
योजनेचे लाभार्थी | आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे |
योजनेचा लाभ | शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक मदत |
योजनेचा उद्देश | आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक विकास करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
शौचालय अनुदान योजनेची उद्दिष्टे : Sauchalay Yojana Registration
- आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबांना त्यांच्या स्वतःचे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी शौचालय अनुदान योजनेचे सुरुवात करण्यात आली.
- तसेच देशाला व राज्याला स्वच्छ बनवण्यासाठी आणि नागरिकांना उघड्यावर शौचास बसवण्यापासून मुक्त करण्यासाठी हे शौचालय अनुदान योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- आणि गरीब कुटुंबातील नागरिकांना त्यांचे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता पासून यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.
- आणि परिसरात दुर्गंधी तसेच रोगराई पसरवण्यापासून थांबवता यावे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रेरित करणे हे आहे.
- व तसेच राज्यातील नागरिकांना सौचालयाचे महत्त्व सांगून शौचालय बांधण्यासाठी प्रेरित करणे.
- घरातील महिलांना उघड्यावर सौच्या बसण्याची वेळ येऊ नये या उद्देशाने देखील या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
शौचालय अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता :
- आणि जे कुटुंब पीएम आवास योजनेचे लाभार्थी आहेत ते या योजनेसाठी पात्र मानले जातील.
- तसेच दारिद्र्यरेषेखाली गरीब कुटुंबांना देखील या योजनेअंतर्गत पात्र मानवी जाईल.
- या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक असेल.
- तसेच लाभार्थी व्यक्तीने यापूर्वी कोणतेही शौचालय अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- आणि या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी व्यक्तीकडे सर्व कागदपत्रे आवश्यक असणे गरजेचे आहे तरच तो या योजनेअंतर्गत पात्र मानला जाईल.
शौचालय अनुदान योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य :
- शौचालय अनुदान योजनेअंतर्गत नागरिकांना स्वतःचा शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते. यामध्ये केंद्र सरकारचा 75% वाटा (9000/- रुपये) व राज्य शासनाचा 25% (3000/- रुपये) असतो. अशाप्रकारे शौचालय अनुदान योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते.
Sauchalay Yojana Registration योजनेचा फायदा:
- शौचालय अनुदान योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांना स्वतःचे शौचालय बांधण्याकरिता योजनेअंतर्गत 12 हजार रुपयांच्या आर्थिक साहेब दिल जाते.
- आणि या आर्थिक मदतीमुळे राज्यातील गरीब कुटुंबे त्यांचे स्वतःचे शौचालय बांधू शकतील.
- आणि या मदतीमुळे नागरिकांना खुल्या वर शौचास बसण्याची गरज लागणार नाही.
- खुल्यावर शौचास बसण्याची गरज भासणार नाही त्यामुळे परिसरात होणारी दुर्गंधी तसेच रोगराई देखील कमी होईल.
शौचालय अनुदान योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील घरी कुटुंबांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- तसेच महाराष्ट्र राज्य बाहेरील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- आणि या योजना अंतर्गत फक्त त्याच कुटुंबांचा समाविष्ट केला जाईल जे स्वतःच्या शौचालय बांधण्यासाठी इच्छुक असतील.
- आणि दारिद्र्यरेषेखाली कुटुंबांनाच या योजनेचे लाभ दिला जाईल.
- आणि ज्या कुटुंबांकडे आधीपासूनच शौचालय आहेत अशा कुटुंबांना लाभ मिळणार नाही.
- आणि एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ देण्यात येईल.
- आणि लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबाने या अगोदर कोणत्याही मोफत शौचालय अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- घरकुल योजना आणि घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत जास्त प्राधान्य दिले जाईल.
- तसेच लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत असेल तर त्याला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- बँक खात्याचा तपशील
- उत्पन्नाचा दाखला
- बीपीएल रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- घोषणा पत्र
- ई-मेल आयडी
शौचालय अनुदान योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- लाभार्थी व्यक्तीला सर्वप्रथम त्यांच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे शौचालय अनुदान योजनेचा अर्ज घ्यायचा आहे व अर्ज विचारलेली माहिती व्यवस्थितरित्या भरून आवश्यकते कागदपत्रे जोडून जमा करायचे आहे.
- कशा पद्धतीने तुम्ही शौचालय अनुदान योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
हे पण वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना : असा मिळवा लाभ | Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana
शौचालय अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- लाभार्थी व्यक्तीला सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर त्याच्यासमोर होम पेज येईल आणि त्यानंतर त्याला नोंदणी करून घ्यायची आहे. त्यासाठी अर्जदाराला स्वतःची माहिती विचारली जाईल ती माहिती व्यवस्थित भरून सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे.
- अशा पद्धतीने अर्जदाराचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल व तुमच्या स्क्रीनवर तसं मेसेज सुद्धा येईल.
- त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर अर्जदाराला लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे.
- लॉगिन करून झाल्यानंतर अर्जदाराला त्याचा जुना पासवर्ड बदलण्याचे ऑप्शन मिळेल आता अर्जदाराला जुना पासवर्ड बदलून नवीन पासवर्ड तयार करायचा आहे.
- त्यानंतर लाभार्थी व्यक्तीसमोर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये न्यू एप्लीकेशन या पर्यायावर कक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर शौचालय अनुदान योजनेचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितरित्या भरून सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया करू शकता.
निष्कर्ष :
जर तुम्हाला Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.
अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा Whatsapp group link