मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 3,000 रुपये पहा सविस्तर माहिती | Mukhyamantri Vayoshri Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhyamantri Vayoshri Yojana : तर सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो तर आजच्या या लेखांमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो महाराष्ट्र शासन हे विविध प्रकारच्या योजना या राबतच असतात परंतु महाराष्ट्र शासनाने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना या नावाची योजना राबवली आहे.

कारण मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत 65 वर्षापेक्षा अधिक जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच योजनेअंतर्गत लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. आणि वर्षाला 36,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

व मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जेष्ठ नागरिकांना कशाप्रकारे अर्ज प्रक्रिया असेल आणि ती अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, वैशिष्ट्य, मुख्य उद्देश आणि योजनेचे फायदे काय असणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि योजनेबद्दल माहिती महत्त्वाची वाटल्यास इतरांबरोबर ही नक्कीच शेअर करा.

Mukhyamantri Vayoshri Yojana : मुख्यमंत्री वयोश्री योजना

Mukhyamantri Vayoshri Yojana
Mukhyamantri Vayoshri Yojana

महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सरकारने सुरू केलेली आहे. व या योजनेची घोषणा 5 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केलेली आहे. व या योजनेअंतर्गत 65 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना वृद्धत्वामुळे अनेक आरोग्याच्या समस्या ह्या होत असतात.

जसे की दृष्टी कमी होणे, ऐकण्यास कमी येणे आणि चालताना त्रास होणे अशा अनेक प्रकारच्या समस्या या ज्येष्ठ नागरिकांना होत असतात त्यामुळेच त्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

व महाराष्ट्र सरकार या योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना त्यांचे जीवनमान सोप्या पद्धतीने जगता यावे यासाठी अतिशय प्रयत्न करत आहे. आणि या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होणार आहे कारण त्यांना या योजनेअंतर्गत 3,000 रुपयांचे आर्थिक मदत प्रत्येक महिन्याला मिळणार आहे . व त्या मदतीमुळे त्यांना आरोग्याशी संबंधित वस्तू आणि उपकरणे सहज खरेदी करू शकतील व त्यांचे जीवन चांगल्या प्रकारे सुधारू शकतील.

Mukhyamantri Vayoshri Yojana याबद्दल थोडक्यात माहिती :

योजनेचे नावमुख्यमंत्री वायोश्री योजना
हि योजना कोना अंतर्गत सुरु करण्यात आलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेचं राज्यमहाराष्ट्र
योजनेचा लाभमहिना ३,००० आणि वार्षिक 36 हजार रुपये आर्थिक मदत
योजनेचे लाभार्थीराज्यातील ज्येष्ठ नागरिक
वयाची अट65 वर्ष किंवा त्या पेक्षा जास्त असावे
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मुख्य उद्देश काय :

महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे 65 वर्षांवरील वय असलेल्या आणि वृद्धत्वामुळे आरोग्याच्या विविध समस्या असलेल्या तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे हा आहे.

तसेच ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या 65 वर्षानंतर त्यांना अनेक विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते व कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे जीवनमान सुधारत नाही याच समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांकरिता प्रत्येक महिन्याला या योजनेअंतर्गत 3,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धत्वामुळे लागणारे विविध प्रकारचे उपकरणे घेता येतील. आणि आरोग्य विषयक समस्यांसाठी सुद्धा कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

Mukhyamantri Vayoshri Yojana या योजनेअंतर्गत देण्यात येणारी उपकरणे ?

  • चष्मा
  • ट्रायपॉड
  • कमरेसंबंधीचा पट्टा
  • फोल्डिंग वॉकर
  • स्टिक व्हीलचेअर
  • ग्रीवा कॉलर
  • कमोड खुर्ची
  • श्रवणयंत्र
  • गुडघा ब्रेस

इत्यादी उपकरणे या योजनेच्या अंतर्गत खरेदी करता येणार आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत मिळणारे फायदे व लाभ :

  • ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयोमानांतर्गत येणाऱ्या अपंगत्व आणि अशक्तपणा यासाठी लागणारे आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल.
  • ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्याकरिता मनस्वस्थ केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन, प्रशिक्षणाचा शुद्ध समावेश.
  • या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपयांचे आर्थिक मदत
  • या योजनेसाठी राज्य सरकार हे वार्षिक 480 कोटी रुपये खर्च करणार आहे.
  • तसेच ज्याने ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख रुपये आहे. तेच ज्येष्ठ नागरिक या योजनेस पात्र राहतील.
  • मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या समस्या स्वतः सोडवू शकतील आणि आत्मनिर्भर बनू शकतील त्यामुळे त्यांना इतरांवर सुद्धा अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही आणि ते त्यांचे जीवनमान सुधरण्यास मदत होईल

मुख्यमंत्री वयोश्री योजनेची पात्रता व निकष काय असणार आहे :

  • अर्जदार व्यक्ती हा मूळचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय हे 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक असेल .
  • अर्जदार व्यक्तीचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा.
  • अर्जदार व्यक्तीचे बँक खाते हे आधार कार्ड ला जोडलेले असणे आवश्यक असेल.
  • तसेच ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच असेल.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • उत्पन्न दाखला
  • बँक खाते पासबुक
  • जात प्रमाणपत्र
  • स्व-घोषणा प्रमाणपत्र

हे पण वाचा :

मागेल त्या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलार पंप सरकारचा मोठा निर्णय पहा अर्ज प्रक्रिया

  • समस्येचे प्रमाणपत्र (डॉक्टरांकडून)
  • ओळखपत्र म्हणजेच ( वोटर ID, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

Mukhyamantri Vayoshri Yojana या योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे :

  • जर अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदार व्यक्तीचे वय 60 पेक्षा कमी असल्यास अर्ज रद्द करण्यात येतो.
  • अर्जदार व्यक्तीचे अपंगत्व 40 टक्के पेक्षा कमी असल्यास सुद्धा अर्ज रद्द करण्यात यरेईल.
  • वृद्ध व्यक्ती आर्थिकदृष्ट्या गरीब नसल्यास अर्ज रद्द करण्यात येईल .
  • तसेच अर्जदार व्यक्तीने जर दुसऱ्या साहित्यासाठी अर्ज केलेला असल्यास हा अर्ज रद्द केला जातो.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया :

Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online

  • सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला आपलाय फोर राष्ट्रीय योजना या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भराने अर्ज भरून झाल्यानंतर त्यासोबत लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे सुद्धा अपलोड करा.
  • सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज पुन्हा एकदा तपासून पहा अर्ज बरोबर आहे की चुकीचा याची खात्री झाल्यानंतरच सबमिट बटनावर क्लिक करा.
  • अशाप्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तेही सोप्या पद्धतीने.

महत्त्वाची सूचना : मुख्यमंत्री वायोश्री योजना अंतर्गत राज्यभरात विविध ठिकाणी शिबिरे राबविले जातात व या शिबिराची तारीख पत्ता आधी सर्व माहिती सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर दिली जाते त्यामुळे अर्जदारांनी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वेळोवेळी या शिबिरांबद्दलची तारीख आणि पत्ता माहिती करून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा.

निष्कर्ष :

जर तुम्हाला Mukhyamantri Vayoshri Yojana या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

अशाच नव नवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

FAQ’s

Q. मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेंतर्गत वृद्धांना किती मदत मिळणार?
ANS : 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत दरमहा 3,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

Q. मुख्यमंत्री वयोश्री योजना म्हणजे काय?
ANS : जे नागरिक महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षाच्या पुढचे आहेत अशा नागरिकांना सरकार अंतर्गत दर महिन्याला 3,000 रुपये रक्कम देण्यात येते त्यामुळेच या योजनेस वयोश्री योजना म्हटले जाते.

Q. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिक वय वर्ष किती असावे?
ANS : या योजनेचा लाभ घेण्यासाठी जष्ठे नागरिकाचे वय हे 65 वर्षे पूर्ण असले पाहिजे.

Q. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्रता काय आहे?
ANS : जे जेष्ठ नागरिक मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी असावे.

Leave a Comment