PM Kisan yojana : नमस्कार मित्रांनो, तर आजच्या लेखात आपण पी एम किसान योजना या योजनेशी संबंधीत संपूर्ण माहिती सविस्तर व सोप्या पद्दतीने पाहणार आहोत.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 1 आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतपर्यंत 17 हप्त्यांमध्ये 34 हजार रुपये देण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
पीएम किसानचा पुढील हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांना दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्या गोष्टी कोणत्या हे जाणून घेणं शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे.
हे पण वाचा :
मागेल त्या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलार पंप सरकारचा मोठा निर्णय पहा अर्ज प्रक्रिया
या योजनेच्या पुढील हप्त्यांद्वारे 2 हजार रुपयांची रक्कम नियमितपणे मिळवायची असेल तर शेतकऱ्यांना ई केवायसी व जमीन पडताळणी करावी लागणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल त्याच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल.
PM Kisan yojana या योजनेचे 2,000 रुपये मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागेल?
पी एम किसन योजनेचे 2,000 रुपये मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची ई केवायसी असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्या व्यतिरिक्त शेतकऱ्याच्या नावावर जमीन देखील असणं आवश्यक आहे. आणि जे शेतकरी या दोन्ही प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळतील.
यानंतर तुम्हाला पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन केवायसी करायचे आहे. यासाठी तु्म्हाला सर्व प्रथम पीएम किसानच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. यानंतर फार्मर कॉर्नरवर ई केवायसी पर्याय निवडायचा आहे. तेथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड चा नंबर नोंदवायचा आहे. यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करायची आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमचा तेथे मोबाईल नंबर नोंदवावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या नंबर वर एक ओटीपी मिळेल. तो ओटीपी क्रमांक नोंदवल्यावर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. यासंदर्भातील मेसेज तुमच्या मोबाईल वर प्राप्त होईल. पीएम किसान सन्मान योजना 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सुरु करण्यात आलेली होती. आणि आतापर्यंत केंद्र सरकारने 17 हप्त्यांमध्ये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सुद्धा करण्यात आलेले आहेत.
हे पण वाचा :
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 3,000 रुपये पहा
आता शेतकरी मित्र हे अठराव्या हप्त्याची प्रत्यक्ष करत आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठराव्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र सरकारनं नमो शेतकरी महासन्मान योजना देखील सुरु केलेली आहे. पीएम किसान योजने प्रमाणित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये सुद्धा दिले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात चार हप्त्यांचे 8 हजार रुपये पाठवले आहेत.
या लाभार्थी यादीत नाव कसे तपासायचे?
- सर्वप्रथम तुम्हाला https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटवर लॉग इन करायचे आहे.
- लॉग इन केल्यानंतर सर्व सूचना काळजीपूर्वक वाचायचे आहेत.
- त्यानंतर वरती उजव्या बाजूला ( PM Kisan ) असलेल्या प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना लाभार्थी यादी 2024 वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्ही नवीन वेबपेजवर रीडायरेक्ट केले जाईल.
- आणि नंतर त्यामध्ये तुम्हाला लाभार्थी यादीतील तुमचं नाव तपासता येईल. (PM Kisan Yojana)
योजनेच्या अधिकृत वेबसाईला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच नव नवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा Whatsapp group link