मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी महिलांना सुवर्ण संधी बघा अर्ज प्रक्रिया काय? | Free Atta Chakki Yojana Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Atta Chakki Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, तर आजच्या लेखामध्ये आपण मोफत पिठाची गिरणी योजनेशी संबंधीत सविस्तर माहिती सोप्या पद्दतीने पाहणार आहोत.

मोफत पिठाची गिरणी योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिलांना त्यांचा स्वतःचा एखादा घरगुती व्यवसाय सुरू करता यावा या उद्देशाने सरकारने महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत जी योजना सुरू करण्यात आली आहे.

तर आजच्या या लेखामध्ये आपण, मोफत पिठाची गिरणी योजना काय आहे? योजनेचे उद्दिष्टे काय असणार आहे, तसेच योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नियम व अटी कोण कोणत्या आहेत, आणि कोणत्या महिलांना योजनेचा लाभ घेता येईल? Free Atta Chakki Yojana Maharashtra , योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? याबद्दलची सर्व माहिती सोप्या पद्धतीने पाहणार आहोत.

Free Atta Chakki Yojana Maharashtra :

Free Atta Chakki Yojana Maharashtra
Free Atta Chakki Yojana Maharashtra

महारष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील बहुतेक महिला सुशिक्षित असतात परंतु त्यांना ग्रामीण भागात कुठल्याच प्रकारचे रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने राज्यातील महिला या बेरोजगार आहेत. आणि या योजनेच्या अंतर्गत महिला तुझ्या घरगुती व्यवसाय उद्योग सुरु करण्यासाठी उत्सुक असतात परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने त्यांना त्यांचा स्वतःचा एखादा उद्योग सुरु करता येत नाही.

हे पण वाचा :

14 जिल्ह्यातील याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 25% पीक विमा | crop insurance farmers

त्याच कारणामुळे ग्रामीण भागातील महिलांना घरगुती एखादा उद्योग सुरु करता यावा. व त्या उद्योगातून थोडेफार पैसे कमावता यावेत जेणेकरून ते स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा आणि दैनंदिन गरजा पुऱ्या करू शकतील या उद्देशाने Mofat Pith Girni Yojana सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे .

आणि योजनेअंतर्गत राज्यातील अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना पिठाची गिरणी खरेदी करण्याकरिता 100 टक्के अनुदान देण्यात येते त्यामुळे महिलांना स्वतःजवळील रक्कम भरण्याची आवश्यकता लागणार नाही.

Free Atta Chakki Yojana Maharashtra थोडक्यात माहिती :

योजनेचे नावमोफत पिठाची गिरणी योजना
योजनेचे राज्यमहाराष्ट्र राज्य
योजनेचा उद्देशमहिलांसाठी रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करणे
योजनेचे लाभार्थीआर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना च या योजनेचा लाभ मिळेल
योजनेचा विभागमहिला व बालकल्याण विभाग
ययोजनेतून मिळणार लाभ100% अनुदानावर मोफत पीठ गिरणीचे वाटप
योजनेची अर्ज प्रक्रियाऑफलाइन

Free Atta Chakki Yojana Maharashtra या योजनेची आवश्यक पात्रता :

  • लाभार्थी महिला ही मूळची महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • या योजनेचा लाभ फक्त 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांनाच घेता येईल.
  • आणि या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1.20 लाखांपर्यंत असावं किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • मोफत पिठाची गिरणी योजनेचा फायदा ग्रामीण आणि शहरी भागातील महिला घेऊ शकतील.

Flour Mill Yojana Maharashtra या योजनेचे फायदे :

  • ही योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत सुरु करण्यात आली आहे.
  • लाभार्थी महिलांना अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नये म्हणून अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी ठेवलेली आहे, यामुळे अर्ज करणाऱ्या महिलांना कोणतीही प्रकारच्या समस्या येणार नाही.

हे पण वाचा :

ladki bahin yojana 3rd installment date | लाडकी बहिण योजनेचे तिसऱ्या हफ्त्याचे 4,500 रुपये या तारखेला होणार जमा

  • या योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदान मिळणार आहे, त्यामुळे लाभार्थी महिलांना स्वतः जवळची कोणतीही प्रकारची रक्कम भरण्याची गरज लागणार नाही.
  • ही योजना खास करून ग्रामीण भागातील महिलांसाठीच सुरु केली आहे. तसेच शहरी भागातील महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • जातीचा दाखला
  • प्रतिज्ञा पत्र
  • रेशन कार्ड
  • व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्यासबाबत नमुना नं ८ अ चा घराचा उतारा जोडता.
  • बँक खात्याचा तपशील
  • वीज बिल
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी

Mofat atta chakki yojana maharashtra apply online अर्ज प्रक्रिया :

  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या महिला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
  • तत्याकरिता त्यांना त्यांच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय मधून किंवा जिल्हा मधील महिला व बचत कल्याण विभाग मध्ये थेट भेट द्यावी लागेल.
  • कार्यालयामध्ये पोहोचल्यानंतर तेथून पिठाची गिरणी योजनेचा अर्ज घ्यायचा आहे. आणि आर्जा मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या व काळजीपूर्वक भरायचे आहे.
  • अर्ज बहरल्यानंतर सोबत लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित जोडायचे आहेत आणि तो अर्ज त्या कार्यालयामध्ये जाऊन जमा करायचा आहे.
  • अशाप्रकारे तुम्ही मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी आशप्रकरे अर्ज करू शकता.

या योजनेच्या अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा.

निष्कर्ष :

जर तुम्हाला Free Atta Chakki Yojana Maharashtra  या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

अशाच नव नवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

FAQ’s

Q. मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

ANS : या योजनेचा अर्ज हा तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा जिल्ह्यामधील महिला व बालकल्याण विभागामध्ये करायचा आहे.

Q. मोफत पिठाची गिरणी योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

ANS : मोफत पिठाची गिरणी योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी लागू राहणार आहे.

Q. मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी किती अनुदान दिले जाते?

ANS : या योजनेसाठी 100% अनुदान दिले जाते .

Leave a Comment