Bandhkam Kamgar Yojana : नमस्कार मित्रांनो, तर आजच्या लेखात आपण बांधकाम कामगार योजना या योजनेशी संबंधीत संपूर्ण माहिती सविस्तर व सोप्या पद्दतीने पाहणार आहोत.
तर आजच्या या लेखाद्वारे आपण बांधकाम कामगार योजनेचा लाभ कसा मिळवायचा, अर्ज कुठे व कसा करायचा, योजनेची उद्दिष्टे काय असणार, योजनेचे फायदे , योजनेच्या नियम व अटी याविषयी संपूर्ण व सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा, आणि या योजनेशी संबंधित माहिती जर महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांना सोप्या पद्धतीने मिळून जाईल.
Bandhkam Kamgar Yojana :
महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना या योजनेसाठी MAHABOCW पोर्टल सुरू केलेले आहे. बांधकाम कामगार योजनेतून राज्यातील बांधकाम मजुरांना आर्थिक मदत दिली जाते .
हे पण वाचा
आणि या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर राज्यातील कामगारांना mahabocw.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करून घ्यायची आहे. महाराष्ट्र सरकारने 18 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्रातील इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगार योजना पोर्टल सुरू केलेले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या योजनेचा सोप्या पद्धतीने लाभ दिला जाणार आहे.
हे पोर्टल बांधकाम विभागाने विशेषतः कामगारांसाठीच बनवलेले आहे. बांधकाम कामगार योजनेंतर्गत राज्यातील कष्टकारी नागरिकांना 2000 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल. याशिवाय महाबॉक पोर्टलच्या अंतर्गत राज्यातील कामगारांना इतर जीवनावश्यक सुविधांचा सुद्धा लाभ मिळणार आहे.
बांधकाम कामगार योजना हि वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखली जाते.
- कामगार सहाय्य योजना
- महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना
- महाराष्ट्र कोरोना सहाय्य योजना
- बांधकाम कामगार योजना
- kamgar yojana form
ह्या कोरोना महामारीमुळे बाधित झालेल्या कामगारांना सरकारकडून या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. आत्तापर्यंत सुमारे राज्यातील 12 लाख बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. जर बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर सर्वप्रथम बांधकाम कामगारांना mahabocw.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन स्वतःची नोंदणी करून घ्यायची आहे.
बांधकाम कामगार योजना थोडक्यात माहिती :
योजनेचे नाव | Bandhkam Kamgar Yojana |
योजना सुरु करणारा विभाग | महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडल |
योजनेचा उद्देश | कामगारांना गृहपयोगी वस्तूचा संच पुरवणे आणि आर्थिक मदत करणे. |
योजनेचे लाभार्थी | बांधकाम कामगार |
योजनेचे राज्य | महाराष्ट्र |
अधिकृत वेबसाईट | https://mahabocw.in |
योजनेचे अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने |
बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्ट :
या योजनेच्या माध्यमातून कामगारांचे आर्थिक परिस्थिती व जीवनमान सुधारणे. आणी बांधकाम कामगारांना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सोप्या पद्धतीने आणि सुलभ रीतीने करता यावी त्यामुळे बांधकाम क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सर्व बांधकाम कामगारांना मदत करणे आणि या योजनेअंतर्गत शासनाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती वेळोवेळी कामगारांपर्यंत पोहोचवणे व त्यांना आर्थिक मदत करून त्यांचे मनोबल वाढवणे.
त्यामुळे त्यांच्या सुरक्षा बद्दलचा विचार करून त्यांचे भविष्य मोठे करणे व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सुख सोयी उपलब्ध करून देणे आणि त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे त्यामुळे कामगारांच्या कौशल्याच्या आधारावरती त्यांना वेगवेगळी कामे देणे.
बांधकाम कामगार योजनेची आवश्यक पात्रता : खालीलप्रमाणे
Bandhkam Kamgar Yojana Eligibility
- बांधकाम कामगार हा मूळचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
- अर्जदाराचे वय हे 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे.
- कामगाराने किमान 90 दिवस काम केलेले असावे.
- बांधकाम कामगारांने कामगार कल्याणकारी मंडळात कामगारांची नोंदणी केलेली असावी.
बांधकाम कामगारांना कोणकोणत्या प्रकारचे गृहपयोगी वस्तूंचा संच मिळणार आहे .
- ताट
- वाट्या
- पाण्याचे ग्लास
- मोठा चमचा (भात वाटपाकरीता)
- मोठा चमचा (वरण वाटपाकरीता)
- पाण्याचा जग (2 लीटर)
- पातेले झाकणासह
हे पण वाचा
- मसाला डब्बा (07 भाग)
- प्रेशर कुकर -05 लिटर (स्टेनलेस स्टील)
- डब्बा झाकणासह (14 इंच)
- डब्बा झाकणासह (16 इंच)
- डब्बा झाकणासह (18 इंच)
- परात
- स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह
- कढई (स्टील)
बांधकाम कामगारांना एवढ्या प्रकारचा गृह उपयोगी वस्तूंचा संच मिळतो.
बांधकाम कामगार योजनेचे फायदे :
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील कामगार घरबसल्या सुद्धा ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना 2000 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत सुद्धा दिली जाते.
- बांधकाम कामगारांना या योजनेच्या माध्यमातून साधनांची पेटी व भांड्याचा संच सुद्धा दिला जातो.
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदतीची रक्कम थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात वितरीत केली जाते.
- बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळवण्याकरिता बांधकाम कामगारांची नोंदणी करणे अत्यंत आवश्यक असणार आहे.
- या योजनेचे अधिकृत पोर्टल ऑनलाइन असल्याने नागरिकांना कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्याची गरज लागणार नाही.
- या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील सर्व मजूर घरबसल्याच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- या योजनेच्या आर्थिक मदतीमुळे कामगारांचे जीवनमान सुधाण्यास मदत होईल.
- बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून कामगारांना त्यांच्या कुटुंबीयांचे योग्य पालनपोषण व्यवस्थित पद्धतीने करता येईल आणि त्यांचे जीवन सुखमय होईल.
या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- आय प्रमाण
- पत्रपत्त्याचा पुरावा
- वय वर्ष 18 पूर्ण असल्याचा पुरावा
- शिधापत्रिका
- वय प्रमाणपत्र
- ओळख प्रमाणपत
- 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल क्रमांक
Bandhkam Kamgar Yojana या योजनेचे अर्ज प्रक्रिया : ( kamgar yojana form )
- सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. ( बांधकाम कामगार योजनेचे अधिकृत वेबसाईट )
- अधिकृत वेबसाईटवर केल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाइटचे होम पेज उघडेल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला कामगार पर्याय दिसेल त्या वरती क्लिक करायचे आहे. आणि कामगार नोंदणी पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
- आता तुम्हाला या योजनेस तुम्ही पात्र आहात की नाहीत या संबंधित माहिती या पेजवर भरावी लागेल.
- माहिती भरून झाल्यावर, तुम्हाला तुमची पात्रता तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करावे लागेल .
हे पण वाचा
14 जिल्ह्यातील याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 25% पीक विमा | crop insurance farmers
- तुम्ही त्या पर्यायावर क्लिक करताच, तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म ओपन होईल.
- आता तुम्हाला नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली तुमची आवश्यक संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
- आणि यानंतर तुम्हाला विचारलेली आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- त्यानंतर तुम्हाला शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल .
अशा प्रकारे तुम्ही सहज ऑनलाइन नोंदणी करू शकाल.
निष्कर्ष :
जर तुम्हाला बांधकाम कामगार योजना या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.
FAQ’s
Q. बांधकाम कामगार योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
ANS : सर्व प्रकारचे बांधकाम कामगार या योजनेसाठी अर्ज करू शकतील.
Q. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना किती भांडी दिली जातात?
ANS : बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून बांधकाम कामगारांना 30 वस्तूंचा भांडी संच दिला जातो.
Q. बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कुठे करायची?
ANS : आपण महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडल विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने सुद्धा नोंदणी करू शकता.