Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana : तर सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजनेशी संबंधित सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना हे महाराष्ट्र सरकारने 27 एप्रिल 2016 मध्ये सुरू केली होती. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य आणि तांत्रिक प्रशिक्षण तसेच जल व्यवस्थापनाच्या साधनांची उपलब्धता करून देणे हे आहे. ही योजना एक महाराष्ट्र राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण कृषी विकास अभियान आहे. आणि या योजनेचा मुख्य उद्देश पाहायला गेला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंब प्राप्त करून देणे आणि त्यांच्यावरची आर्थिक ओझे कमी करणे व शेती क्षेत्रात त्या शेतकऱ्याला आर्थिक मदत देणे.
तर आजच्या या लेखामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना लाभ कसा मिळवायचा?, आणि योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, तसेच योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा, योजनेची पात्रता काय याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana :
ही योजना महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाच्या अंतर्गत सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच अनुसूचित जाती व नव बौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांची जीवनमान सुधारण्यास ठीक आहे देण्यासाठी सन 1982 ते 83 पासून राबविण्यात येत असलेली अनुसूचित जाती उपाय योजना बदललेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आवश्यकता लक्षात घेता सदर योजनेमध्ये सुधारणा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना या नावाने 5 जानेवारी 2017 रोजी राज्य शासनांतर्गत योजना राबवण्याची मान्यता देण्यात आली.
हे पण वाचा : महिलांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : लगेच करा अर्ज | Udyogini Yojana Scheme
2016 17 च्या अर्थसंकल्पात माननीय वित्तमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या नवीन योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या आणि शेतकऱ्यांच्या अतिरिक्त स्वावलंबी करण्यासाठी तसेच विहीर खोदण्यासाठी लाखन पर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येईल अशी घोषणा केली. व त्याचप्रमाणे विहिरीवर विद्युत पंप बसवणे आणि ज्या ठिकाणी विद्युत ग्रेड मधून वीज पुरवठा शक्य असेल त्या ठिकाणी सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून दिली जाईल. व शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न केला नाही. असे माननीय वित्तीय मंत्री यांनी अर्थसंकल्पात मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना : थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना |
---|---|
यांनी सुरु केले | महाराष्ट्र सरकार |
योजनेस सुरुवात | 27 एप्रिल 2016 |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील अनुसूचित व नवबौद्ध शेतकरी |
योजनेचा उद्देश्य | अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे |
योजनेचा विभाग | कृषी विभाग, महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://agriwell.mahaonline.gov.in/ |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेचा उद्देश
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जाती आणि नववृत्त शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आर्थिक मदत करणे.
- तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारणे.
- शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक मदत करणे.
- आणि शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा ओलावा टिकून राहावा त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य ते आर्थिक मदत करणे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेची वैशिष्ट्ये :
- या योजनेअंतर्गत जर कोरडवाहू शेतकरी असल्यास त्याला नवीन विहीर खोदण्यासाठी अनुदान देणे.
- आणि योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आर्थिक मदत.
- आणि या योजनेमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत कशाप्रकारे अनुदान दिले जाते : Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana
महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वागत योजना राबविण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार सदर योजनेच्या अंतर्गत खालील प्रमाणे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या घटकांनुसार अनुदान वाटप केले जाईल.
घटक | अनुदान मर्यादा |
---|---|
नवीन विहीर | 2,50,000 /- रुपये |
जुनी विहीर दुरस्ती | 50,000 /- रुपये |
इनवेलबोअर | 20,000 /- रुपये |
पंप सेट | 20,000 /- रुपये |
वीज जोडणी आकार | 10,000 /- रुपये |
शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण | 1,00,000 /- रुपये |
ठिबक सिंचन संच | 50,000 /- रुपये |
तुषार सिंचन | 25,000 /- रुपये |
Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana आवश्यक पात्रता :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२४ अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष पूर्ण कराव्या लागतील. ते खालीलप्रमाणे पाहुयात.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्ती हा अनुसूचित जाती किंवा नव बौद्ध असणे आवश्यक असेल.
- आणि लाभार्थी शेतकऱ्याकडे सक्षम पदी कार्याने दिलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल.
- योजनेअंतर्गत लाभ घेणारा शेतकरी हा मूळ शेतकरी असला पाहिजे आणि त्याच्याकडे शेती योग्य जमीन असणे आवश्यक असेल.
- तसेच अर्ज करणार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असेल.
- लाभार्थी व्यक्तीकडे वैद्य आधार कार्ड असणे आवश्यक असेल आणि आधार कार्ड च्या आधारित याची ओळख पडताळणी केली जाईल.
हे पण वाचा : या तारखेला बांधकाम कामगारांना मिळणार 5000 हजार रुपये दिवाळी बोनस | Bandkam Kamgar Diwali Bonus 2024
- लाभार्थी व्यक्तीकडे जमीन मालकीचा पुरावा असणे आवश्यक असेल आणि त्याचा वैयक्तिक सातबारा उतारा असणे देखील आवश्यक असेल.
- लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे शासनाने निश्चित केलेल्या मर्यादितच असणे आवश्यक असेल.
- लाभार्थी व्यक्तीचे वैद्य बँक खाते असणे आवश्यक असते कारण योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभार्थीठ त्याच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
- लाभार्थी व्यक्तीने यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा किंवा योजनेतील निकष पूर्ण केले नसावे.
Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana Documents आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- जमिनीचा 7/12 उतारा आणि 8 अ चा नमुना
- बँक खाते पासबुक
- विहीर घ्यायची आहे त्या जागेचा फोटो
- विहीर नसल्याचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची अर्ज प्रक्रिया
Dr.Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana 2024 Online Apply
- सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- वेबसाईट लॉगिन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर नवीन युजर नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
- ते करून झाल्यानंतर युजर रजिस्ट्रेशन फॉर्म यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या गावाचे नाव, जिल्हा, तालुका, पिनकोड, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरायची आहे.
- माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या नंबर वर ओटीपी तो टाकून पासवर्ड टाका.
- अशा पद्धतीने तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार होईल.
- त्यानंतर लॉगिन प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
- तुम्हाला मिळालेल्या लॉगिन युजर नेम पासवर्ड आणि कॅपच्या टाकून तुम्ही लॉगिन करून घ्या.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन अर्ज ओपन होईल त्यात तुम्हाला विचारलेली तुमची माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे.
- त्यानंतर अर्ज दाखल या पर्यायावर क्लिक करा.
- नंतर चेतन या पर्यावर क्लिक करून शेव या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला विचारलेले आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला 24 रुपयांची नोंदणी शुल्क त्या फॉर्मला भरायचा आहे.
- त्यासाठी पेमेंट या पर्यायावर क्लिक करून तो 24 रुपयांचा नोंदणी शुल्क भरून सबमिट करा.
अशाप्रकारे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना अतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता आणि योजनेचा लाभ मिळू शकतात.
FAQ’s
Q. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसाठी किती शेत जमीन लागते?
ANS : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त 6 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
Q. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत नवीन विहीर घेण्यासाठी किती रुपये अनुदान देण्यात येते?
ANS : या योजनेअंतर्गत नवीन विहीर घेण्यासाठी 2.5 लाख रुपये अनुदान देण्यात येते.
निष्कर्ष :
जर तुम्हाला Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.
अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा Whatsapp group link