मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज | Free Silai Machine Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Silai Machine Yojana : सरकार अंतर्गत हि एक अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजेच मोफत शिलाई मशीन योजना. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांतील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे. तर आजच्या या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती व या योजनेचे फायदे काय असणार आणि अर्ज करण्याची प्रक्रिया कशा प्रकारे असणार याबद्दल जाणून घेणार आहोत.

त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि या योजनेशी संबंधित माहिती जर महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेची माहिती सहजपणे मिळून जाईल.

मोफत शिलाई मशीन योजना काय आहे?

Free Silai Machine Yojana
Free Silai Machine Yojana

फ्री शिलाई मशीन योजना ही देशातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्याकरिता सुरू करण्यात आलेली आहे अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल आणि या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन मिळेल. आणि 20 ते 40 वयोगटातील महिलांना फ्री शिलाई मशीन दिली जाते.

हे पण वाचा

याचा लाभ शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांना दिला जाईल. आत्तापर्यंत केंद्र सरकारने देशातील 50 लाखांपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा म्हणजेच मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहेत. आणि फ्री शिलाई मशीन मिळवून घरबसल्या कपडे शिवून महिलांना रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण करता येईल व त्यामुळे महिला सशक्त आणि आत्मनिर्भर बनते. तसेच श्रमिक महिलांसाठी ही केंद्र सरकारची अत्यंत कल्याणकारी व महत्त्वाची योजना ठरेल.

Free Silai Machine Yojana थोडक्यात माहिती :

योजनेचे नावमोफत शिलाई मशीन योजना
योजनाकोनांतर्गत सुरु करण्यात आलीपंतप्रधान नरेंद्र मोदी
योजनेचा उद्देशआर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना उद्योगाकडे वळवणे.
योजनेचे लाभार्थीग्रामीण व शहरी भागातील महिला
योजनेचा लाभया योजनेअंतर्गत महिलांसाठी मोफत शिलाई मशीन देणे
अधिकृत वेबसाईटhttps://www.india.gov.in/

मोफत शिलाई मशीन योजेचे वैशिष्ट्ये :

  • आर्थिक सहाय्य : या योजनेअंतर्गत पात्र महिलांना सरकार मोफत शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपयांची आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दिले जाईल.
  • लक्षित गट : ही योजना मुख्यतः आर्थिक दृष्ट गरीब कुटुंबातील महिलांसाठी आहे की ज्यांना स्वयंरोजगारासाठी मदतीची अत्यावश्यक गरज आहे.
  • कौशल्य विकास : केवळ शिलाई मशीन घेऊन थांबत नाही तर या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीनचे कौशल्य विकसित करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण दिले जाते.
  • व्यापक दृष्टिकोन : ही योजना फक्त शिलाई मशीन मिळवण्यासाठीच मर्यादित नाही तर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे जेके पारंपारिक कौशल्य असलेल्या कामगारांना सक्षम करण्यासाठी व्यापक दृष्टिकोन घेते.

मोफत शिलाई मशीन योजेचे लाभार्थी :

  • महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना.
  • तसेच देशातील 50 लाख पेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ देण्याचे लक्ष सरकारने ठेवले आहे.

Free Silai Machine Yojana पात्रता :

  • लाभार्थी व्यक्तीचे वय हे 18 ते 40 च्या दरम्यान असली पाहिजे.
  • लाभार्थी व्यक्तीने शिलाई मशीन चालवण्याची प्रशिक्षण घेतलेल्या असावे प्रशिक्षण घेतलेले नसेल तर तसा अर्ज करावा जेणेकरून त्यांना या योजनेअंतर्गतच मोफत प्रशिक्षण मिळून जाईल.
  • लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न हे 12,000 पेक्षा कमी असले पाहिजे.

हे पण वाचा

  • जर लाभार्थी व्यक्ती अपंग असेल तर तसा त्याचा अपंगत्व असल्याचा पुरावा देखील सादर करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी व्यक्तीच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरदार नसावा.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • लाभार्थी व्यक्तीच्या आधार कार्ड
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र ( वार्षिक उत्पन्न हे 1.2 लाखांपर्यंत असणे आवश्यक असेल )
  • जन्म दाखला
  • रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • अर्जदार व्यक्तीचे फोटो
  • अर्जदार व्यक्तीचा अपंग असेल तर अपंग असल्याचे प्रमाणपत्र
  • लाभार्थी व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेला प्रमाणपत्र
  • शिलाई मशीन चालवण्याचे प्रशिक्षण पत्र

मोफत शिलाई मशीन योजनेची अर्ज प्रक्रिया :

सरकारकडून ज्या इच्छुक महिलांना मोफत शिलाई मशीन मिळवायची आहे त्यांनी खाली दिलेल्या प्रक्रिया अंतर्गत अर्ज करावा.

  • सर्वप्रथम लाभार्थी महिलेने पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला जायचे आहे.
  • त्यानंतर अधिकृत वेबसाईटवरून Free Silai Machine Yojana फॉर्म डाउनलोड करायचा आहे.
  • तो फॉर्म डाउनलोड करून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे.
  • त्यानंतर अर्जामध्ये विचारलेल्या सर्व माहिती व्यवस्थित भरायचे आहे.
  • अर्जामध्ये पूर्ण माहिती भरल्यानंतर लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्ज सोबत जोडायचे आहेत.
  • अर्ज भरल्यानंतर पूर्ण अर्ज संबंधित विभागात जाऊन जमा करायचा आहे.
  • अर्ज जमा केल्यानंतर विभागांतर्गत त्या अर्जाची तपासणी केली जाईल.
  • पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन दिली जाईल.

हे पण वाचा

जर तुम्हाला Free Silai Machine Yojana या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

FAQ’s :

Q. फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ कोणत्या महिलेला मिळेल?

ANS :  फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ देशातील श्रमिक कुटुंबातील महिलांना दिला जाईल. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

Q. फ्री शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

ANS : फ्री शिलाई मशीन योजना देशातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही एक महत्वपूर्ण योजना आहे.

Q. फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कसा करावा?

ANS:  फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आपल्या या लेखात देण्यात आलेली आहे.त्यामुळे लेख व्यवस्थित वाचा.

Leave a Comment