Gay Gotha Anudan Yojana : नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील बहुतेक शेतकरी 90% शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून गाय, म्हशी पालन व्यवसाय करतात. परंतु त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या गाय, म्हशी साठी एखादे पक्क छत असलेला गोठा बांधता येत नाही.
अशा सर्व गरजू पशुपालकांना आता गाई, म्हशी साठी पक्का गोठा बांधण्यासाठी गाय गोठा अनुदान योजना अंतर्गत लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे , योजनेची पात्रता, अटी, अर्ज प्रक्रिया या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि या योजनेशी संबंधित माहिती जर महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेची माहिती सहजपणे मिळून जाईल.
हे पण वाचा
Gay Gotha Anudan Yojana :
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात पाहिजे तेवढा रोजगार उपलब्ध होत नसल्या कारणाने त्यांना स्थलांतर करून नोकरीसाठी दुसऱ्या गावांमध्ये नाहीतर शहराच्या ठिकाणी वास्तव्यास जावे लागते. त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत वेगवेगळ्या योजनांच्या एकत्रीकरणातून हि योजना राबविण्यात येणार आहे. केंद्राच्या मनरेगा योजनेच्या माद्यमातून दिला जाणारा रोजगार देखील या योजनेशीच जोडला जाणार आहे.
तुम्हाला तर माहीतच असेल की आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय आणि म्हैशी असतात कारण गायी आणि म्हशी पालन हा शेतकऱ्यांचा पारंपरिक आणि शेतीसाठी जोडव्यवसाय आहे. परंतु गायी-म्हशींच्या निवाऱ्यासाठी ग्रामीण भागात जागा तर उपलब्ध असते परंतु त्या जागेत त्या गाय म्हशींसाठी व्यवस्थित निवारा नसतो. तसेच जनावरांना ठेवण्यात येणारी हि जागा खडबडीत व आबडधोबड आणि खाचखळग्यांची असल्यामुळे ग्रामीण भागातील गोठे हे कच्चेच बांधलेले असतात.
व जनावरांचे शेण व मूत्र साठविण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याकारणाने ते गोठ्यात इतरत्र पडलेले असते. तसेच पावसाळ्यात जमिनीला दलदलीचे स्वरूप प्राप्त झालेले असते. याच जागेत जनावरे बसत असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. त्यामुळे काही जनावरांना काही गंभीर आजारांमुळे हजारो रुपये खर्च करावे लागतात काही वेळेस गाई म्हशींची कास निकामी होते. अशा वेगवेगळ्या कारणांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.
त्यामुळेच राज्य शासनाअंतर्गत शेतकऱ्यांना गाय म्हशींसाठी गोठा बांधता यावा यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार आहे.
गाय गोठा अनुदान योजना थोडक्यात माहिती :
योजनेचे नाव | Gay Gotha Anudan Yojana |
योजना कोणांतर्गत सुरू करण्यात आली | महाराष्ट्र सरकार |
ही योजना कधी सुरू झाली | 3 फेब्रुवारी 2021 |
योजनेचे उद्देश काय | ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पशुपालनासाठी प्रोत्साहित करणे. |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्रातील गरजू शेतकरी |
योजनेतून मिळणारा लाभ | शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यास आर्थिक मदत किंवा अनुदान |
योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
गाय गोठा अनुदान योजनेचे उद्दिष्ट :
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या गाई – म्हशीसाठी गोठा बांधून देण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हे देखील या योजनेचे प्रमुख उद्देश्य आहे.
- तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांना बांधण्यासाठी कायमस्वरूपी पक्के छत असलेला गोठा बांधणे.
- त्यामुळे जनावरांचे ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून संरक्षण होईल.
- राज्यातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पशुपालन करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
Gay Gotha Anudan Yojana वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :
- गाय गोठा अनुदान योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांच्या निवाऱ्यासाठी म्हणजेच गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
हे पण वाचा
मागेल त्या शेतकऱ्यांना मिळणार “सौर कृषी पंप” ऑनलाईन अर्ज सुरु | magel tyala saur krushi pump yojana
- व तसेच या योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँकेत थेट DBT द्वारे जमा करण्यात येईल.
- गाय गोठा अनुदान योजना ही शरद पवार ग्रामसमृद्धी योजना या नावाने सुद्धा ओळखली जाते.
Gay Gotha Anudan Yojana Benefits : फायदे
- राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करणे.
- तसेच शेतकरी गाय व म्हशीचे दूध, शेण, मूत्र इत्यादी विकून सुद्धा चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
- आणि या योजनेअंतर्गत पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.
- राज्यात रोजगाराच्या नवनवीन प्रकारच्या संधी उपलब्ध करणे.
- या योजनेअंतर्गत जनावरांना गोठा बांधून पाऊस, ऊन, थंडी, वारा यापासून रक्षण करणे.
गाय गोठा अनुदान योजनेचे नियम व अटी खालील प्रमाणे :
- अर्जदार व्यक्ती हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
- अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक असेल नाही तर त्याला या योजनेची लाभ मिळणार नाही.
- अर्जदार व्यक्ती हा आर्थिकदृष्ट्या गरीब असला पाहिजे आणि याआधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्याची स्वतःची जमीन असणे आवश्यक असेल.
गाय गोठा अनुदान योजनेच्या माध्यमातून लाभार्थी व्यक्ती त्याच्या पशुसंख्येच्या प्रमाणात मिळणारे अनुदान आणि गोठा बांधन्याची पद्धत :
- गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत गाय आणि म्हैशिसाठी पक्क्या गोठ्याचे बांधकाम करण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा बांधण्यात येणार आहे. त्यासाठी या योजनेअंतर्गत एकूण 77188/- रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
- 6 पेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजेच जर 12 गुरांसाठी एक गोठा बांधायचा असेल तर तो गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान सुद्धा दिले जाईल .
- गुरांसाठी 26.95 चौ.मी.जमीन पुरेशी धरण्यात आली आहे. आणि त्याची लांबी 7.7 मी.
- आणि रुंदी 3.5 मी असेलगव्हाण 7.7 मी. X 0.2 मी. X 0.65 मी. आणि 250 लीटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके बांधण्यात येतील.
- जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी 200 लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधून देण्यात येईल.
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीचे काम मंजूर झाल्यास योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे फोटो
सदर लाभार्थ्याचे काम मंजूर झाल्यास Gay Gotha Anudan Yojana योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे फोटो
- काम सुरू करण्या पूर्वीचा फोटो
- काम सुरू असतानाचा फोटो
- काम पूर्ण झाल्याचा फोटो व लाभार्थी सह फोटो इत्यादी
- हे तीन प्रकारांमधील फोटो अंतिम देयक प्रस्ताव सोबत 7 दिवसात सादर करणे बंधनकारक असेल.
योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र
- ऑनलाइन जॉब कार्ड किंवा जॉब कार्ड झेरॉक्स प्रत
- जन्म दाखला
- जातीचा दाखला
- जमिनीचा 7/12 व 8 अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 चा उतारा
- बँक पासबुक ची माहिती
- ग्रामपंचायतचे प्राधान्य क्रमानुसार शिफारस पत्र
- लाभार्थी अर्जदाराकडे अल्पभूधारक प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल
- ग्रामपंचायत शिफारस पत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- स्वयंघोषणापत्र
गाय गोठा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत :
लाभार्थी व्यक्तीला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याने सर्वप्रथम त्यांच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन त्या ग्रामपंचायत कार्यालयातून गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा आणि त्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून त्यासोबत लागणारे आवश्यक ती कागदपत्रे जोडावेत आणि तो अर्ज पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा. अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता ऑफलाइन पद्धतीने.
हे पण वाचा
निष्कर्ष :
जर तुम्हाला Gay Gotha Anudan Yojana या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.
अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा Whatsapp group link