मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी 4 लाख रुपये अनुदान, तर जुन्या विहिर दुरुस्तीसाठी 1 लाख अनुदान मिळणार | Magel Tyala Vihir Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Magel Tyala Vihir Yojana : नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक सरकारतर्फे मोठी आनंदाची बातमीची घोषणा करण्यात आलेली आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत मागेल त्याला विहीर देण्यात येणार आहे.

तर मागेल त्याला विहीर योजनेच्या माध्यमातून सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहेत.

तर आजच्या लेखामध्ये आपण या योजनेचा लाभ कोणते शेतकरी घेऊ शकतात? आणि त्यासाठी लागणारी पात्रता काय असणार आहे? योजनेचा फॉर्म कुठे भरायचा ? योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? या योजनेअंतर्गत अनुदान कधी व किती मिळणार? इत्यादी बद्दल सर्व माहिती आजच्या या लेखामध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत.

हे पण वाचा

ladki bahin yojana 3rd installment date | लाडकी बहिण योजनेचे तिसऱ्या हफ्त्याचे 4,500 रुपये या तारखेला होणार जमा

त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि या योजनेची संबंधित माहिती जर महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबत ही शेअर करा. जेणेकरून त्यांनाही या योजनेची माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

Magel Tyala Vihir Yojana

Magel Tyala Vihir Yojana
Magel Tyala Vihir Yojana

पावसाच्या कमतरतेमुळे राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकाच्या सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याकरणाने आणि पाण्याच्या अभावामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यामुळेच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावा लागते. त्या कारणाने शेतातील वेगवेगल्या पिकांच्या सिंचनासाठी विहिरींमधून पाण्याची उपलब्धता केली जाऊ शकते.

परंतु विहीर खोदण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज लागत असल्याकारणाने राज्यातील बहुतांश शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत. आणि त्या शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याकारणाने शेतकरी विहीर खोदण्यास असमर्थ असतात. त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांच्या विहिरींशी संबंधित समस्यांचा विचार करून राज्य सरकारने राज्यात विहीर अनुदान योजना सुरु करण्याचा एक मोठा आणि महत्वाचा निर्णय हाती घेतलेला आहे.

मागेल त्याला विहीर योजना थोडक्यात माहिती :

योजनेचे नावMagel Tyala Vihir Yojana
योजनेचे राज्यमहाराष्ट्र
योजनेअंतर्गत मिळणारा लाभविहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयांचे अनुदान
योजनेचा उद्देशविहीर खोदण्यासाठी अनुदान आणि जुन्या विहिरी दुरुस्त करण्यासाठी सुद्धा अनुदान
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने

मागेल त्याला विहीर योजना या योजनेचा उद्देश :

  • या योजनेचा मुख्य उद्देश पहायला गेला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे.
  • म्हणूनच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांच्या सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता व्हावी याच उद्देशाने सरकारने मागेल त्याला विहीर योजना ची सुरुवात केली आहे.
  • व तसेच राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेती क्षेत्राकडे प्रोत्साहित करणे.
  • आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबांतील शेतकऱ्यांना शेतात विहीर खोदण्यासाठी पैशांसाठी कोणावर सुद्धा अवलंबून राहण्याची गरज लागत नये व तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये.
  • राज्यातील इतर नागरिकांना शेती करण्यासाठी आकर्षित करणे.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी पाण्याचा स्रोत निर्माण करून देणे आणि पाण्यासाठी आत्मनिर्भर बनविणे व पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे होणारे नुकसान टाळण
  • आणि शेतातील पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे.

हे पण वाचा

मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी महिलांना सुवर्ण संधी बघा अर्ज प्रक्रिया काय? | Free Atta Chakki Yojana Maharashtra

  • शेतकरी मित्रांना त्यांच्या शेतातील पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची चिंता करण्याची आवश्यकता भासू नये हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

मागेल त्याला विहीर अनुदान योजनेची वैशिष्ट्ये :

  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्या करिता 4 लाख रुपये इतके अनुदान दिले जाते.
  • आणि या योजनेची अर्ज प्रक्रिया सुद्धा सोपी ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी कुठल्याच अडचणींना सामोरे जावे लागत नाही.
  • महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे त्यांच्या पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे आत्महत्या करतात अशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची ठरेल.
  • मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा त्यासाठी महाराष्ट्र सरकारने गावात मंजूर करण्यात येणाऱ्या विहिरींची संख्यांची अट ही रद्द केलेली असून आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर योजनेचा लाभ सोप्या पद्धतीने मिळवता येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक सहाय्याची रक्कम ही थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाईल.
  • राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • मागेल त्याला विहीर अनुदा योजनेला पंचायत समिती विहीर योजना या नावाने देखील ओळखले जाते.

या योजनेतून शेतकऱ्यांना होणारा फायदा काय?

  • मागेल त्याला विहीर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या घर कामांसाठी व शेतातील पिकांसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल.
  • आणि यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल.
  • आणि या योजनेमुळे राज्यातील शेतकरी स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनतील.
  • आणि शेतकऱ्यांना पैशां अभावी विहीर खोदण्यासाठी कोणावर हि अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. आणि कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान सुद्धा होणार नाही.
  • आणि शेतकरी शेतीसाठी प्रोत्साहित होतील आणि इतर नागरिक सुद्धा शेती क्षेत्राकडे आकर्षित होण्यास मदत होईल.

Magel Tyala Vihir Yojana या योजनेचे लाभार्थी :

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या व विमुक्त जाती
  • इतर मागास वर्गातील शेतकरी
  • जॉब कार्ड धारक व्यक्ती
  • महिला कर्ता असलेल्या कुटुंबातील महिला
  • इतर मागासवर्गीय
  • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
  • जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी
  • दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी
  • निर्देशित जमाती
  • सीमांत शेतकरी म्हणजेच ज्यांच्याकडे 2.5 एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
  • अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे 5 एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
  • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे.

मागेल त्याला विहीर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • मोबाईल क्रमांक
  • ई-मेल आयडी
  • रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खात्याचा तपशील
  • जमिनीचे कागदपत्रे 7/12 उतारा आणि 8 a
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सामुदायिक विहीर असल्यास सर्व पात्र लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचना.
  • मासामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यां चे करारपत्र.

मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया :

सर्वप्रथम पात्र अर्जदार शेतकऱ्याला त्यांच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल व नंतर ग्राम सेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून अर्जासोबत लागणारे आवश्यक अशी कागदपत्रे जोडून अर्ज जमा करून घ्यायचा आहे.

हे पण वाचा

बांधकाम कामगारांना मिळणार गृहपयोगी वस्तूंचा संच आणि 5,000 रुपयांची आर्थिक मदत | त्यामुळे आजच करा अर्ज | Bandhkam Kamgar Yojana

अशाप्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकाल.

मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :

Magel tyala vihir yojana in maharashtra apply online

  • सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. (या योजनेची अधिकृत वेबसाईट )
  • नंतर तुम्हाला होम पेज वर मागेल त्याला विहीर योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि सोबत आवश्यक कागदपत्रे सुद्धा अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे आहे.
  • अशा प्रकारे तुम्ही या योजनेशी संबंधित अर्ज प्रक्रिया सोप्या पद्धतीने करू शकता.

निष्कर्ष :

जर तुम्हाला Magel Tyala Vihir Yojana या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

अशाच नव नवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

Leave a Comment