pm kisan yojana 18th installment : सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध योजना ह्या गरजू नागरिकांना लाभ घेण्यासाठीच असतात. जर तुम्हालाही एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहे. जसे की पंतप्रधान किसान सन्माननीय योजना या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत. त्याच शेतकऱ्यांना त्या योजनेचा हप्त्याचा लाभ मिळतो. सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपयांचा लाभ देते आणि हे पैसे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना दिले जाते. आता पुढच्या हप्त्याचे म्हणजेच 18 हप्त्याचे देखील पैसे लवकरच रिलीज होणार आहे 18 वा हप्ता कधी दिला जाऊ शकतो हे तुम्हाला माहित आहे का पी एम किसान योजनेचा 18 हप्ता कधी मिळेल ते जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
pm kisan yojana 18th installment कधीपर्यंत जमा होईल.
पी एम किसान योजनेचे लाभार्थी असणारे शेतकरी हे 18 हप्त्याची वाट आतुरतेने पाहत आहेत. 18 हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. पण मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसन योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोंबर मध्ये दिला जाईल असा दावा देखील करण्यात आलेला आहे. परंतु सरकारकडून 18 हप्ता कधी दिला जाईल याची अजून पर्यंत अधिकृत घोषणा केलेली नाही.
हे पण वाचा
मागेल त्या शेतकऱ्यांना मिळणार “सौर कृषी पंप” ऑनलाईन अर्ज सुरु
गेले काही रेकॉर्ड्स बघताच पीएम किसान योजनेअंतर्गत दिलेल्या प्रत्येक हप्ता हा 4 महिन्यांच्या अंतराने दिलेला आहे. अशा स्थितीत जून महिन्यात 17 वा हप्ता देण्यात आला आणि त्यानुसार 18 वा हप्ताह दिला जाऊ शकतो असेही बोलले जात आहे. परंतु सध्या तरी सरकार अंतर्गत या योजनेच्या अठराव्या हप्त्याची अपडेट अजून पर्यंत देण्यात आलेली नाही. आणि जर सरकारतर्फे या योजनेच्या 18 हप्त्याचे अपडेट्स आले तर आम्ही तुम्हाला त्वरित कळवू.
या योजनेचा 18 हप्ता मिळणार की नाही हे कसे कळणार?
जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत नव्याने जर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 18 हप्ता मिळणार की नाही हे कसे जाणून घ्यायचे. ते जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला जावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला “know your status” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल आणि स्क्रीनवर दिलेला कॅपच्या कोड भरावा लागेल.
- वरील सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर “get details” या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस दिसेल त्यावरून तुम्हाला कळेल की तुम्हाला अठराव्या हफ्त्याचा लाभ मिळणार की नाही.
हे पण वाचा
निष्कर्ष :
जर तुम्हाला pm kisan yojana 18th installment या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.