Sharad Pawar Gram Samriddhi Yojana : तर मित्रांनो राज्य सरकारांतर्गत सुरू करण्यात आलेल्या शरद पवार ग्राम समृद्धी योजने विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जसे की, ही योजना नक्की काय असणार आहे, या योजनेअंतर्गत कोणकोणत्या प्रकारच फायदे मिळणार आहे, योजनेची पात्रता काय, उद्देश ही सर्व माहिती आपण आजच्या या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या योजने अंतर्गत कोणतीही शंका राहणार नाही.
आणि या योजनेशी संबंधित माहिती जर महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेची माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना काय आहे? :
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना शेती व्यवसायास जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांना पशुपालन करण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत आर्थिक मदत केली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पशुपालकांचे ऊन, वारा, थंडी यापासून संरक्षण करण्यासाठी शेड बांधणे आवश्यक असते.
हे पण वाचा
त्यामुळे हे शेड बांधण्यासाठी मोठा खर्च येतो मात्र सरकारने अशाच समस्या लक्षात घेता शेतकऱ्यांना शेड बांधण्याकरिता शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत आर्थिक मदत अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे. जेणेकरून शेतकरी आपल्या जनावरानसाठी आणि पशुपक्ष्यांसाठी व्यवस्थित पद्धतीने आणि सुरक्षित शेड निर्माण करू शकतील.
शरद पवार ग्राम समृद्धि योजना थोडक्यात माहिती :
योजनेचे नाव | शरद पवार ग्राम समृद्धी योजना |
---|---|
योजना कोण अंतर्गत सुरू करण्यात आली | महाराष्ट्र सरकार |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा आणि खेड्याचा विकास करणे |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक |
योजनेतून मिळणारा लाभ | व्यवसायासाठी अनुदान दिले जाते |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन पद्धतीने |
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana उद्दिष्टे :
![Sharad Pawar Gram Samriddhi Yojana](https://yojana24tass.com/wp-content/uploads/2024/09/Add-a-heading-97-compressed-1024x576.jpg)
- शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होते. आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेच्या अंतर्गत शेतकरी त्यांच्या जनावरांसाठी शेड बांधून त्यांना ऊन वारा पाऊस थंडी यापासून व्यवस्थितरित्या संरक्षण करू शकतो.
- या योजनेअंतर्गत शेतकरी हा त्याच्या शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय करू शकतो आणि त्या व्यवसायास या योजनेअंतर्गत आर्थिक मदत सुद्धा मिळू शकतो.
- शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना आत्मनिर्भर बनवणे हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
- आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास केला जातो.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेती व्यवसायास जोडधंदा म्हणून पशुपालन करण्यास सुद्धा प्रोत्साहित केले जाते.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पशुपालनासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते परंतु त्या समस्याना सामोरे जाऊ नये याकरिता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पशुंसाठी गोठा बांधण्यास आर्थिक मदत केली जाते. जेणेकरून शेतकरी त्यांच्या पशुंसाठी व्यवस्थित रित्या शेड बांधून त्यांना सुरक्षित ठेवू शकतात.
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana पात्रता :
- या योजनेचा लाभ घेणारा नागरिक किंवा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
- फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळवता येईल.
- तसेच लाभार्थी व्यक्ती ग्रामीण भागातील रहिवासी असला पाहिजे आणि त्याच्याकडे शेती असली पाहिजे. तरच त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळवता येईल.
हे पण वाचा
आता मिळणार गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान असा मिळवा लाभ | Gay Gotha Anudan Yojana
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana फायदे खालील प्रमाणे :
- महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या योजनेचा म्हणजेच शरद पवार ग्राम समृद्धी कर्ज योजनेचा घेता येईल.
- या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गाई, म्हशी, शेळ्या व मेंढयांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
- या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आणि त्यांना रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध होईल.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी खालील गोष्टींसाठी अनुदान मिळेल :
या योजनेच्या अंतर्गत खालील गोष्टींसाठी अनुदान देण्यात येईल.
- गाय व म्हशी यांच्यासाठी गोठा बांधणे
- शेळी पालन करण्यासाठी शेड बांधणे
- कुक्कुट पालनासाठी शेड बांधणे
- भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग
गाय व म्हशी यांच्यासाठी गोठा बांधणे
- अकुशल खर्च – रु. 6,188/- (प्रमाण 8 टक्के )
- कुशल खर्च – रु.71,000/- (प्रमाण 92 टक्के )
- एकूण – रु.77,188/- (प्रमाण 100 टक्के )
शेळीपालन शेड बांधणे
- अकुशल खर्च – रु. 4,284/- (प्रमाण 8 टक्के)
- कुशल खर्च – रु.45,000/- (प्रमाण 92 टक्के)
- एकूण – रु.49,284/- (प्रमाण 100 टक्के)
कुक्कुटपालन शेड बांधणे
- अकुशल खर्च – रु. 4,760/- (प्रमाण 10 टक्के)
- कुशल खर्च – रु.45,000/- (प्रमाण 90 टक्के)
- एकूण – रु.49,760/- (प्रमाण 100 टक्के)
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
- अकुशल खर्च – रु. 4,046/- (प्रमाण 38 टक्के)
- कुशल खर्च – रु. 6,491/- (प्रमाण 62 टक्के)
- एकूण – रु.10,537/- (प्रमाण 100 टक्के
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जन्माचा दाखला
- ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र
- या योजनेच्या आधी लाभार्थी व्यक्तीने सरकारच्या कोणत्याही पशुपालन योजनेचा लाभ घेतलेला त्याबद्दलची घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.
- लघु धारक प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- लाभार्थी अर्जदाराकडे कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र असेल पाहिजे.
- योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून शेड साठी लाभार्थी व्यक्तीने बजेट जोडणे अनिवार्य आहे.
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana या योजनेची अर्ज प्रक्रिया :
- शरद पवार ग्राम समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम लाभार्थी व्यक्तीने त्यांच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जायचे आहे.
- तेथे गेल्यानंतर या योजनेसाठीचा अर्ज घ्यायचा आहे.
- त्यानंतर नंतर अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थित रित्या भरून आवश्यक ती कागदपत्र जोडून नंतर तो अर्ज कार्यालयामध्ये व्यवस्थित रित्या जमा करायचा आहे.
हे पण वाचा
मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज | Free Silai Machine Yojana
- अर्ज भरून झाल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल त्यानंतर तो अर्ज ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जमा केला जाईल आणि अर्जदार व्यक्तीला अर्जाची पावती दिली जाईल.
- अशा पद्धतीने तुम्ही शरद पवार ग्रामीण समृद्धी योजने अंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
निष्कर्ष :
जर तुम्हाला Sharad Pawar Gram Samriddhi Yojana या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.
अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा Whatsapp group link