यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना | असा करा अर्ज | Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana : तर सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्र शासनामार्फत अनेक विविध प्रकारच्या योजना ह्या सतत राबवल्या जात असतात त्यातीलच ही एक योजना म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त व साधी योजना हे आहे. या योजनेची संपूर्ण व सविस्तर माहिती सोप्या पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत.

आजच्या या लेखाद्वारे आपण यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ कसा मिळवायचा? या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणती, आणि पात्रता काय असणार आहे व अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे, याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेची संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांनी शेअर करा.

Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana :

Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana

आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेले आहे. परंतु आजही आपल्या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये नागरिकांना राहण्यासाठी घर उपलब्ध नाही. म्हणूनच गावोगावी जाऊन भटकंती करून संसार करणाऱ्या समाजामध्ये अनेक लोकांना आपल्या ला पाहायला मिळतील आणि देशाच्या विविध राज्यात विकासाबरोबरच राज्यातील भावभावी जाऊन भटकंती करून उपजीविका करणारे लोक यांचा देखील विकास व्हावा.

याचे तुने आज देखील विमुक्त आणि भटक्या जमातीचे लोक गाव सोडून आपला उदरनिर्वाह करतात अशावेळी मुक्ती आणि भटक्या जमातीच्या लोकांना महाराष्ट्र शासन अतर्गत यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आणि त्यांना त्यांचे स्वतःचे घर बांधण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत देखील करण्यात येणार आहे.

हे पण वाचा :

या दिवशी नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे 4,000 रुपये खात्यात होणार जमा सरकारचा मोठा निर्णय | namo shetkari yojana

भटक्या विमुक्त जातीच्या नागरिकांमध्ये कुठेतरी स्थिरता यावी याकरिता आणि त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत वाढावा याकरिता तसेच त्यांचे राहणीमान सुधरावे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी राज्य शासनाने या योजनेच्या माध्यमातून अशा भटक्या जातीतील लोकांना घरकुलासाठी आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे. सत्य सुरू करण्यात आलेल्या विभाज्याच्या मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून 20 टक्के लाभार्थ्यांचा सहभाग 30% शासनांतर्गत बांधकाम आणि 50% वित्त संस्थांकडून अनुदान दिले जाईल.

सध्या सुरू असलेल्या विजाभच्या मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून 20% लाभार्थ्यांचा सहभाग 30 टक्के शासनामार्फत बांधकाम अनुदान व 50 % वित्त संस्थाकडून अनुदान दिले जाते. यशवंतराव मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून भटक्या विमुक्त जातीतील कुटुंबांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हे या योजनेचे उद्दिष्टे आहे. आणि त्यांना कोणत्याही कारणांमुळे स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये त्याकरिता महाराष्ट्र शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केलेली आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना थोडक्यात माहिती :

योजनेचे नावYashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana
योजनेचे राज्यमहाराष्ट्र राज्य
योजनेचा विभागइतर मागास बहुजन कल्याण विभाग
योजनेचा उद्देशभटक्या जाती व भटक्या जमातीतील कुटुंबांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरासाठी आर्थिक मदत मिळवून देणे.
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्रातील भटक्या जाती व भटक्या जमाती समुदायातील कुटुंब
योजनेचा लाभया योजनेच्या माध्यमातून मोफत घर उपलब्ध करून देणे
योजनेची अर्ज प्रक्रियाऑफलाईन

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनेची उद्दिष्टे :

  • आपल्या देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या स्वतःचे पक्के घर मिळावे या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.
  • भटक्या आणि मुक्त जाती व भारतीय व्यक्त जमाती यांना उत्पन्नाचा पोट मिळवून देणे आणि त्यांना त्यांचे एक कच्चे घर मिळवून देणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • तसेच भटक्या जमातीतील नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हे देखील सरकारचे उद्देश आहे.
  • स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर देखील वाटचालीसाठी समाजाला मूळ प्रवाहात आणू शकल्या नाहीत या योजनेअंतर्गत त्यांना आर्थिकदृष्ट मदत करून त्यांना पक्के घर मिळवून देणे आणि आपल्या देशाला चांगले जनतेच्या मूळ प्रवाह आणणे हा या योजनेचा मागचा प्रमुख उद्देश आहे.

Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana या योजनेची पात्रता :

  • लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असली पाहिजे तरच या योजनेअंतर्गत अर्ज करू शकाल.
  • अर्ज करणारे व्यक्ती हा मूळचा भारताचा रहिवासी असला पाहिजे.
  • लाभार्थी व्यक्तीच्या जातीचे जात प्रमाण पत्र असणे आवश्यक असेल.
  • या योजनेचा लाभ अशा लोकांना घेता येईल की जे भूमीही नाहीत परंतु स्वतःचे हक्काचे घर बांधण्यासाठी स्वतःची मालकीची जागा आहे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचे कर्ज नसावे.
  • अर्जदार व्यक्ती हा कमीत कमी सहा महिने एका जागेवरती राहिलेला असावा.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कुटुंबातील एकाच व्यक्तीला अर्ज करता येईल.
  • लाभार्थी व्यक्तीने याच्या आधी कोणत्याही केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या घरकुल आवास योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते असणे अत्यंत आवश्यक असेल जेणेकरून त्यांना या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँकेचा होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून घर संपूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकारी तपासणी करतील व लाभार्थ्यास लाभ देतील.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे लाभार्थी :

  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • दारिद्र रेषेखालील कुटुंब

हे पण वाचा :

पीएम इंटर्नशिप योजना या योजने अंतर्गत बेरोजगार तरुणांना दर महिन्याला मिळणार 5,000 हजार रुपये भत्ता | pm internship yojana

  • पाल टाकून राहणारे
  • परित्यक्त्या किंवा अपंग महिला
  • पूरग्रस्त कुटुंब

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेची आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • जातीचा दाखला
  • आदिवास प्रमाणपत्र
  • उत्पन्न दाखला
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खात्याचा तपशील
  • मोबाईल नंबर
  • कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याने महाराष्ट्र शासनाच्या इतर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेतलेला नसेल तर 100/- रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत : खालील प्रमाणे

  • यशवंतराव चव्हाण घरकुल वसाहत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • अर्जदाराला त्याच्या जवळच्या जिल्हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
  • वरती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे जमा करून समाज कल्याण विभागामध्ये अर्ज दाखल करावा.
  • अशाप्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.

हे पण वाचा :

महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणार मोफत 3 सिलेंडर : पहा कसा मिळवायचा लाभ | Mukhyamantri Annapurna Yojana

Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana Portal
योजनेची अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष :

जर तुम्हाला Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

Leave a Comment